हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी पनवेलमध्ये आरोग्य व लसीकरण शिबीर : यात्रेकरूंनी लसीकरण शिबीराचा अवश्य लाभ घ्या
पनवेल : पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूसांठी मेंदूज्वर (मेनिन्गोकोक्क्ल वॅक्सीन) व हंगामी ताप (सिझनल इन्फ्लुन्झा वॅक्सीन) लसीकरण शिबीराचे आयोजन ३० मे ते ३ जून २०२३ रोजी महाराष्ट्रभूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३०० हून अधिक नागरिकांनी हज यात्रेसाठी लसीकरणाकरिता नाव नोंदणी केली आहे. या सर्वांचे येत्या ३ जूनपर्यंत लसीकरण महाराष्ट्रभूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणार आहे.यासाठी पनवेल महानगरपालिका उपजिल्हा रूग्णालयास वैद्यकिय आरोग्यअधिकारी,वाहन व इतर आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.
हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी या लसीकरण शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने आयुक्त श्री.गणेश देशमुख करण्यात आले आहे.
Post a Comment