खारघरच्या मोकाट कुत्र्यांना आवरा : जगणे मुश्किल करणाऱ्या रहिवाशांची सुटका करा माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांची महानगरपालिकेकडे मागणी
पनवेल- खारघरच्या जलवायू विहार सोसायटीतील भटक्या कुत्र्यांना आवरा अशी मागणी माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात, खारघर शहरातील क्रमांक ४ मधील जलवायू विहार फेज वन या सोसायटीत जवळपास ९०० सदनिका धारक राहतात,सदर रहिवाशांनी माझ्याकडे तक्रार केली आहे , सदर सोसायटीत मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे आहेत. कुत्र्यांमुळे या सोसायटीतील रहिवाशांचे राहणे देखील मुश्किल झालेले आहे. त्याचबरोबर त्यांचा जीव देखील धोक्यात आलेला आहे .भटक्या कुत्र्यांनी अनेक लहान मुलांना तसेच काही ज्येष्ठ नागरिकांना चावा घेण्याचे गंभीर प्रकार देखील घडले आहेत. याबाबत वेळोवेळी त्यांनी त्या प्रकारच्या तक्रारी देखील पनवेल महानगरपालिकेकडे केलेल्या आहेत. एक वर्षापासून सदर सोसायटीतील भटक्या कुत्र्यांचे (स्टरलायझेशन) निर्बीजीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे व त्यांचा त्रास देखील वाढत चालला आहे तरी आपण या गंभीर प्रकारात लक्ष घालून त्या ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून सदर ठिकाणच्या रहिवाशांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
Post a Comment