पनवेल शिवसेना महानगरप्रमुख ॲड.प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार- प्रसार करणाऱ्या व्याख्याते,अभ्यासकांची बैठक
पनवेल - शिवसेना पनवेल महानगरप्रमुख,माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांच्या विचारांचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विविध व्याख्याते, अभ्यासक यांची बैठक बोलावली.
यावेळी ज्येष्ठ सावरकर अभ्यासक दुर्गेश परुळकर, सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे, युवा व्याख्याते वैद्य परीक्षित शेवडे, पार्थ बावस्कर, ॲड.श्रीराम ठोसर, अनिल गानू, विनोद सातव,श्री. सचिन जोशी इ. मान्यवर उपस्थित होते. स्वा.सावरकरांचा त्याग अतुलनीय असून त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्यास आणि त्यांच्यावरील खोट्या आरोपांचे सप्रमाण खंडण करण्यासाठी अभियान अधिक व्यापक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तुमच्या मागे उभी करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिले.
Post a Comment