भात खरेदी योजनेंतर्गत पनवेलमधील शेतकऱ्यांना बोनस : लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश
पनवेल - तालुक्यातील शेतकऱ्यांना भात खरेदीच्या अनुषंगाने बोनस मिळवून देण्यात आला असून शेतकऱ्यांनी नामदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानले.
शासकीय आधारभूत भात खरेदी योजनेंतर्गत जवळच्या भात खरेदी केंद्रावर भात विक्रीसाठी नोंदणी सुरु होती. पनवेल तालुक्यात २०७० शेतकरी असून कोट्यापेक्षा भात खरेदी झाल्याचे कारण देत भात खरेदी बंद करण्यात आली होती. या संदर्भात शेतकरी वारंवार भात खरेदी करून घ्यावी यासाठी केंद्रावर फेऱ्या मारत होते मात्र त्यांच्या पदरी निराशा पडत होती. त्यातील काही शेतकऱ्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेतली त्यानुसार त्यांनी सदरचा विषय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्याकडे मांडला असता त्या अनुषंगाने शासकीय आधारभूत भात खरेदी योजनेंतर्गत खरेदी मर्यादा वाढवावी किंवा पर्यायाने बोनस द्यावा, अशी मागणी दोन्ही आमदार महोदयांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार या विषयावर नामदार रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ कार्यवाही केली.
त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांचे भात खरेदीसाठी घेता आले नाही त्या जवळपास २७० शेतकऱ्यांना पर्याय म्हणून बोनस रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्याबद्दल शेतकऱ्यांनी नामदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानले.
भात पीक खरेदी न झाल्याने घरातच पडून होता, त्यामुळे मोठी चिंता लागली होती पण पर्यायाने बोनस रक्कम मिळाल्याने दिलासा मिळाला. मी या संदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानतो.
- संजय कोंडिलकर, शेतकरी
Post a Comment