कामोठ्यात केमिकलचा उग्र वास : कॉलोनी फोरमच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पाहणी
कामोठे - केमिकलच्या उग्र वासामुळे कामोठे कॉलोनी फोरमच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कामोठ्यात येऊन पाहणी केली.
कामोठे शहरामध्ये केमिकलचा उग्र वास येत होता. त्याबाबत अनेक नागरीकांना श्वसनाचा त्रास झाला. खाडीकिनारील सेक्टर 36 येथे ह्या वासाचे प्रमाण जास्त होते. दिवसभर अनेक नागरिकांनी सोशल मेडियावर संताप व्यक्त केला. कामोठे कॉलोनी फोरमच्या समन्वयकांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी ह्यांना कालच्या प्रकाराबाबत जाब विचारत तत्काळ पाहणी करण्यासाठी मेसेज केले. त्याचीच दखल घेत आज रात्री 11:30 वाजता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळातर्फे श्री. किल्लेदार, श्री.उमेश जाधव, डॉ.धपाटे असे तीन अधिकारी सेक्टर 36 येथील खाडीकीनारी पाहणीसाठी आले होते. कालच्या घटनेबाबत जाब विचारला असता टँकरद्वारे केमिकल खाडीमध्ये सोडले जात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली तसेच काही महिन्यांपुर्वी कळंबोली येथे एका टँकरवर कारवाई केली असुन लवकरच कामोठे खाडीकीनारी गस्त वाढवत केमिकल टँकरवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
तसेच तळोजा एम.आई.डी.सीमधील प्रक्रीया केलेले केमिकल युक्त सांडपाणी वाहून नेणारी पाईप लाईन कामोठे खाडीजवळ फुटली असून त्यामधून सुद्धा केमिकल गळती होत आहे. त्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी एमआईडीसीकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच ती लाईन दुरुस्त करून घेण्याबाबत अधिकारींनी आश्वस्त केले तसेच नागरिकांच्या मागणी नुसार खाडीकिनारी पोलीसांची गस्त वाढवणे तसेच सीसीटीव्हि कैमरा बसविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
कामोठे कॉलोनी फोरमतर्फे कामोठे शहरातील वायूप्रदूषणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत सर्व शासकीय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने केवळ पाहणीपुरते काम न करता शहरातील वायू प्रदुषण थांबवण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी कामोठे कॉलोनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव ह्यांनी केली.
यावेळी पाहणी दरम्यान कफ कामोठे सचिव सौ. रंजना सडोलीकर, कॉलोनी फोरमचे समन्वयक बापु साळुंखे, राहुल बुधे, अरुण जाधव, संदिप लबडे, तुषार दळवी,देवानंद बाठे, प्रविण भालतडक, भुमी टॉवर सोसायटीचे अध्यक्ष विलास कळंगे, जय गणेश सोसायटीचे अध्यक्ष संतोष सावंत उपस्थित होते.
Post a Comment