News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अलिबागचा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच

अलिबागचा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच

अलिबाग, (जिमाका) :- कांदा हे पिक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकट करणारे तर कधी डोळयात पाणी आणणारे पिक आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात लागवड होणारा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच आहे. या कांद्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर तो अधिकच लोकप्रिय होत आहे.
       जिल्ह्यात पूर्वापार खंडाळा, पवेळे, नेहुली, सहाण, ढवर, कार्ले, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम, आवास अशा अलिबाग नजिकच्या ठराविक गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची  साधारणपणे 250 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. 
     अलिबागचा पांढरा कांदा लाल गुलाबी कांद्यासारखा तिखट नसून गोड असतो. त्याला मोत्यासारखा शुभ्र चकाकदार रंग असून त्याला मोठे आयुर्वेदिक महत्व आहे. डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र रोहा, ग्रेट मिशन ग्रुप कन्सलटन्सी पुणे, जीएमजीसी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांनी संयुक्तपणे पेटंट ऑथॉरीटी ऑफ इंडीया, चेन्नई  यांच्याकडे “अलिबाग पांढरा कांदा” चे भौगोलिक मानांकनासाठी सन 2019 मध्ये अर्ज सादर केला होता. त्याला करोना कालावधीमुळे उशीर झाला होता. मात्र पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन सन सप्टेंबर 2022 मध्ये प्राप्त झाले. आता प्रकल्प संचालक आत्मा आणि पणन महामंडळ यांच्या मार्फत शेतकऱ्यांचे " Authorised User Registration "  करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 
     हा कांदा पातीसह काढल्यानंतर सुकविण्यात येतो व पहाटेच्या वेळी त्याची वेणी बांधली जाते नंतर वेणीसह कांदे विक्रीसाठी बाजारात येतात. त्यामुळे पानातील Absecic acid कांद्यात उतरते आणि त्याला सुप्तावस्था प्राप्त होते. या वैशिष्टयपूर्ण प्रक्रियेमुळे पांढरा कांदा न कुजता वर्षभर हवेशीर वातावरणात चांगल्या पध्दतीने टिकतो. त्यामुळे त्याला वर्षभर चांगला बाजार भाव मिळतो. 
     कांद्यातील कमी प्रमाणातील सल्फर घटक आणि समुद्रालगतचे खारे वारे व रेतीमय उथळ हलकी जमीन यामुळे या कांदयाला वैशिष्टयपूर्ण चव येते, या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे त्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. 
    काही शेतकरी कांदयाचे बी तयार करतात ते साधारण 600-800 Kg/ha या प्रमाणात तयार होते. बाजारामध्ये बियाणे 3 हजार 500  ते रु.4 हजार किलोग्रॅम या दराने विकले जाते. तर कांद्याची वेणी 3 ते 4 किलो ग्रॅम वजनाची असते व ती 200-300 रू या दराने विकली जाते. काही शेतकऱ्यांनी आता कांदा निर्यात करण्याची तयारी सुरू केली आहे. या कांद्याचे उत्पादन हेक्टरी 33 टन इतके येते. उत्पादनासाठी येणारा खर्च रू. 4 लाख 50 हजार प्रती हेक्टरी असून रू. 10 लाख इतके उत्पादन एका हंगामात मिळते. साधारण रू. 25 हजार  प्रति टन हा दर मिळाला तर प्रति हेक्टरी रू. 5 लाख इतका निव्वळ नफा पांढरा कांदा हे पिक देऊ शकतो.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment