News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महिलादिनी महिला लघुउद्योजकांचा सन्मान : माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित

महिलादिनी महिला लघुउद्योजकांचा सन्मान : माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित

                      पनवेल - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे होत आहेत "चूल आणि मूल"  या शब्दांच्या पलीकडे जाऊन आज महिलांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे,अशावेळी या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केले जावे या भावनेतून माजी नगरसेविका सुरेखा मोहकर यांनी प्रितमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधील लघुउद्योजिका महिलांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


        या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे, डॉ. श्री बिरमोळे सर,  ज्येष्ठ नागरिक श्री.देसाई काका सौ.मनीषा परदेशी,सौ.वैशाली शाहआणि महिला वर्ग उपस्थित होते.


        अगरबत्ती, साबण, विविध प्रकारची सरबते, फराळ बनवणे यासोबतच आज इन्शुरन्स आणि मार्केटिंग क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

           आज महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. आपल्या संसाराचा गाडा यशस्वीरीत्या हाकत असतानाच आज यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे याबद्दल मला त्यांचा नक्कीच अभिमान वाटतो यापुढेही अशा प्रकारच्या महिलांना व्यवसायामध्ये आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत उभे राहू.:-
         प्रितम जनार्दन म्हात्रे
          माजी विरोधी पक्षनेता
          पनवेल महानगर पालिका

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment