लोकशाही दिन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ३ एप्रिल २०२३ रोजी
अलिबाग (जिमाका):- जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.माहे एप्रिल 2023 चा लोकशाही दिन सोमवार, 03 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी कळविले आहे.
Post a Comment