पेण तालुका मनसेला खिंडार : शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश
पेण - पेण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडला असून मनसेचे पेण तालुकाध्यक्ष रुपेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.ं
पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील, महिला तालुका अध्यक्ष रेखा तांडेल, महिला शहर अध्यक्ष निकिता पाटील, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष निकेश पाटील, पेण शहर अध्यक्ष आदित्य कदम, तालुका उपाध्यक्ष हनुमान नाईक, सचिन भोईर, तालुका सचिव हिरामण जेधे, हमरापूर विभाग अध्यक्ष साहिल म्हात्रे, पूर्व विभाग अध्यक्ष ओमकार कचरे, वडखळ विभाग अध्यक्ष रोहित पाटील, कासू विभाग अध्यक्ष धनाजी पाटील, वाशी विभाग अध्यक्ष हिरामण पाटील आदी मनसेच्या प्रमुख पदाधिकार्यासह असंख्य शाखा प्रमुख, गाव प्रमुख व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
Post a Comment