News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

तरुणांनी मराठी भाषेचे जतन करा- डॉ.समिधा गांधी

तरुणांनी मराठी भाषेचे जतन करा- डॉ.समिधा गांधी

        पनवेल - मराठी भाषेला हजारो वर्षांचा वारसा आहे. हा वारसा, ही परंपरा जतन करण्याचे काम तरुण पिढीने करावे असे आवाहन डॉ. समिधा गांधी यांनी कळंबोली येथे केले.
        कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे मराठी भाषा दिन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी डॉ. समिधा गांधी बोलत होत्या. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रीती महाजन उपस्थित होत्या,तर या समारंभास महाराष्ट्र राज्य साहित्य- संस्कृती मंडळाचे सदस्य,रायगडभूषण कोमसापचे संपर्कप्रमुख प्रा. एल.बी.पाटील,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्राचार्य राजेंद्र पालवे, श्रीमती दर्शना आंग्रे, ज्योत्स्ना  राजपूत,रामदास गायधने उपस्थित होते. 
        यावेळी महाविद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभाच्या विविध स्पर्धांमध्ये विजयी व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
      यापुढे बोलताना डॉ. समिधा गांधी म्हणाल्या,जुन्या परंपरा, संस्कृतीचे रक्षण करतो का? हा प्रश्न आजच्या तरुणपिढी पुढे आहे, म्हणून या गोष्टींचा विचार करता तरुणांनी मनातूनच मराठी भाषेचे जतन केले पाहिजे, तिचे संवर्धन करा हे आपल्यासारख्या तरुण पिढीच्या हातात आहे असे आवाहनही त्यांनी केले.
      प्रा. एल.बी. पाटील यांनी आपल्या भाषणात, मराठी भाषेमुळे आपले अस्तित्व आहे. या भाषेला अनेक बोलीभाषा आहेत. या बोलीभाषा म्हणजे मराठीचे वैभव आहे. बोलीभाषा ही प्रमाण भाषा आहे.समाजात हितावह लेखन करणे म्हणजे साहित्य निर्माण होणे,म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची संस्कृती जपली पाहिजे असे त्यांनी सांगितले कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी,मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली गेली पाहिजे. मराठी भाषा ही अतिशय जुनी भाषा आहे. मराठी भाषेतील अनेक विपुल साहित्य आज उपलब्ध आहे. महाविद्यालयीन तरुणांनी त्याचं मनोमन वाचन करावं असं गणेश कोळी यांनी सांगितले.
        महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रीती महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, भाषा ही आपली ओळख आहे.भाषेच्या बोलीभाषा ह्या दैनंदिन जीवनात बोलल्या गेल्या पाहिजेत,हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाईल.मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम हे तरुण पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त केला. 
       यावेळी जेष्ठ गझलकार ज्योत्स्ना राजपूत,कवयित्री दर्शना आंग्रे यांनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.रमेश जाधवर तर कार्यक्रमाचे उपस्थितांचे आभार मराठी विभाग प्रमुख डॉ. मनीषा बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री सुळे हिने केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment