युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या ४ खेळाडूंना रायगड भूषण पुरस्कार
पनवेल- अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेतर्फे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या ४ खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील मानाचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया ही संस्था गेल्या ३० वर्षांपासून डॉ. मंदार पनवेलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली मार्शल आर्टस् मधील विविध क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवर खेळाडूंना घडवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहे.
शिहान निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कु. वरद केणी याने थाई बॉक्सिंग क्रीडा प्रकारात एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक, साहिल सिणारे वूशु खेळात तर राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, शिहान प्रशांत गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. रोहित भोसले किकबॉक्सिंग खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि कु. प्रद्युम्न म्हात्रे याने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत प्राविण्य मिळवल्याबद्दल त्यांना रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Post a Comment