आरोग्यासाठी वैभववाडीत भव्य सरकारी योजना कॅम्पियन
रत्नागिरी - मॉरीशिअस, युरोपसह परदेशाचा फिल देणा-या शांत, स्वच्छ, सुंदर निसर्गरम्य कोकणात व खाद्य संस्कृतीची नवलाई सातासमुद्रापार असणा-या कोकणात, त्याचसोबत कोकणातील नागरिकांचा आनंदी स्वभाव, उत्तम शाररीक ,मानसिक आरोग्य हीच लाईफस्टाईल असणाऱ्या कोकणात, आरोग्यासाठी वैभववाडीत भव्य सरकारी योजना कॅम्पियन सुरु झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हातील वैभववाडी तालुक्यात आरोग्याची काळजी घेणाऱ्याकेंद्र शासनाच्या योजनेचा नागरिकांना लाभ होण्यासाठी, जनजागृती अभियान म्हणून प्रत्येक गावा गावात ,वाडी वाडीत, घरा घरापर्यंत आयुष्यमान भारत कार्ड,ई श्रम कार्ड, हेल्थ कार्ड केंद्र सुरू करण्यात येत आहे.असे आयुष्यमान भारत योजनेचे वैभववाडी आय टी प्रमुख किशोर दळवी यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत सर्व समस्याला तोंड देत संपूर्ण आयटीटीमने वैभववाडी तालुक्यातील ३७ गावांपैकी नाधवडे, वेंगसर, मांगवली ,तिरवडे तर्फेसौंदळ, तिथवली, नानिवडे, करूळ, दिगशी, नेर्ले, उंबर्डे , या ११ गावात आयुष्यमान भारत योजनेची केंद्र सुरु केली , वैभववाडी तालुक्यातील ३७ गावांपैकी ११ गावांनी लाभ घेतला आणि या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य फायदे म्हणजे भारत सरकार कडून अधिकृत ५ लाखांचा आरोग्य विमा दरवर्षी असणार आहे.तर ई-श्रम योजनेचे मुख्य फायदे म्हणजे भारत सरकार कडून २ लाख रुपयांपर्यंत विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाईल, अपघाती कायमचे अपंगत्व आल्यास 1लाख रुपये पर्यंतचा लाभ लाभार्त्याला मिळू शकतो.तसेच हेल्थ कार्ड,म्हणजे एक प्रकारे तुमच्या आरोग्यासंबंधीच्या माहितीचं खातं असेल. यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती नोंदवलेली असेल.
या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता या पुढे वैभववाडीत तालुक्यात गावा गावात आय टी टीम माध्यमातून प्रत्यके गावामध्ये कॅम्प भरवून जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ मिळण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड,ई श्रम कार्ड, हेल्थ कार्ड केंद्र सुरू करण्यात येणार आहेत तरी अधिक माहितीसाठी आय टी प्रमुख किशोर दळवी.साक्षी ऑनलाईन सर्व्हिसेस, मु.पो.उंबर्डे.ता. वैभववाडी जि.सिंधुदुर्ग.वेळ : सकाळी १० ते ५ वा.या पत्त्यावर व 9421648429 या मो क्र संपर्क साधावा.असे वैभववाडी आयुष्यमान भारत योजनेचे आय टी प्रमुख किशोर बळीराम दळवी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment