रायगड जिल्हा कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोमिलन!
अलिबाग - रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर रायगड काँग्रेसचे नेते सातत्याने टिका करत होते परंतु आज राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे महेंद्र घरत यांचे मनोमीलन झाले आणि वादावर पडदा पडला.
दोघांच्या झालेल्या बैठकीमध्ये , येत्या काळात येऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात तसेच विविध समित्यांवर होणाऱ्या नेमणुका, जिल्हा नियोजन समिती मार्फत होणारी कामे, विशेष अधिकारी (SEO), विविध निवडणुकांमध्ये देण्यात येणारी उमेदवारी आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी येणाऱ्या काळात कॉंग्रेस पक्षाला प्रत्येक निवडणुकीत तसेच विविध समित्यांवर नेमणूक व विविध विकास कामे यांमध्ये सन्मानपूर्वक सहभाग देऊन कॉंग्रेस पक्षाच्या खांद्याला खांदा लावून काम करू असे आश्वासित करण्यात आले.
या बैठकीवेळी खासदार सुनील तटकरे , रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे चिटणीस प्रविण ठाकूर, महिला कॉंग्रेस अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर आदि उपस्थित होते.
Post a Comment