२५ हजारांची एफडी करून कन्या जन्माचे स्वागत ... धुतुम ग्रामपंचायतीचा निर्णय ...
उरण : उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायत हद्दीमध्ये जन्माला येणाऱ्या कन्या रत्नाचे स्वागत २५ हजार रुपयांची एफडी करून करण्यात येईल असा ठराव ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आला आहे.
मासिकसभा व महिला ग्रामसभेत महिला दिनानिमित्त धुतूम ग्रामपंचायतने ऐतिहासिक निर्णय घेतला,असा निर्णय घेणारी रायगड जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत आहे.कोरोनानंतर धुतुम ग्रामपंचायतची महिला ग्रामसभा झाली,सोबत हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिकसभा व ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आला असून दिनांक ८ मार्च २०२२ पासून महिला दिनाचे औचित्य साधून धुतूम गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्या जन्माचे स्वागत योजना म्हणून एफडी नव कन्येच्या नावे करण्यात येईल असा सर्वानुमते धाडशी निर्णय घेण्यात आला आहे.
त्याची अंमलबजावणी ८ मार्च २०२३ पासून लागू होईल याची माहीत हळदीकुंकू समारंभात देण्यात आली.त्यावेळी महिलांनी या योजनेचे आणि सरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
या सभेला सरपंच रेश्मा ठाकूर, माजी सरपंच सीताबाई ठाकूर, माजी उपसरपंच वैशाली पाटील, माजी उपसरपंच आशा ठाकूर, माजी उपसरपंच सविता ठाकूर, सदस्या पूजा ठाकूर, सदस्या निर्मला ठाकूर, करुणा घरत माजी उपसरपंच, रेश्मा रणधीर ठाकूर बचत गट अध्यक्ष , पूजा शक्ति ठाकूर, साधना प्रकाश ठाकूर, वंदना सदानंद ठाकूर, अलका रामचंद्र ठाकूर, शमिता दता ठाकूर, शोभा लक्ष्मण ठाकूर, प्राथमिक शाळा धुतूम महिला शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत महिला कर्मचारी, विविध महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि भगिनींनी समारंभात सहभाग घेतला.
या प्रसंगी ग्रामसेवक विनोद मोरे यांनी विविध योजनांची माहिती दिली तर उपसरपंच शरद ठाकूर यांनी अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहीती, येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी आवश्यक सहकार्याची भूमिका महिला कडून अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. तर लवकरच प्रत्येक कुटंबाला IOTL तर्फे ओला आणि सुका कचरासाठी कचराकुंड्या देण्यात येतील अशी आनंदाची बातमी देण्यात आली.
Post a Comment