पनवेल महापालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण 100 टक्के पूर्ण ....

पनवेल : कोविड १९ लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील १८ वर्षावरील नागरिकांचा १०० टक्के कोविड लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानूसार १६ जानेवारी २०२१ला महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांचे यामध्ये पेालिस विभाग, महसूल विभाग आदि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. चौथ्या टप्प्यात १८ वर्षावरील नागरिकांचे तर आता पुढील टप्प्यात १५-१८वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे.
पालिका हद्दीतील ग्रामीण भागातील जनतेसाठी प्रत्येक गाव - पाड्यांवर लसीकरण सत्र उभारण्यात आले. यामुळे पहिल्या डोसचे १००% गावांचे लसीकरण होऊ शकले. शासकीय ओळखपत्र नसणाऱ्यांचे विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. वारांगना, बेडरिडन, गर्भवती, दिव्यांग अशा विविध घटकांना सामावून त्यांचे विशेष लसीकरण आयोजित करण्यात आले. पालिका हद्दीतील विविध वृध्दाश्रम, तळोजा जेल याठिकाणीही लसीकरण करण्यात आले. तसेच वॉर रूमच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरण केंद्राबाबत माहिती देण्याकरिता टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता.
लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात होण्याकरीता ७९ खाजगी रुग्णालयांना अर्बन टास्क फोर्स अंतर्गत मान्यता देऊन जवळपास १५० खाजगी लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील लसीकरण व मोठ्या सोसायट्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण झाले.
मिशन कवच कुंडल अंतर्गत पालिका क्षेत्रातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण पुर्ण होण्याकरीता IEC, बॅनर, माईकिंग,गणेशोत्सव,नवरात्रोत्स्व अंतर्गत लसीकरणाचे कॅम्प लावण्यात आले. मान्यवरांचे व्हिडीओ याद्वारे पालिकेने जनजागृती करण्यात आली. यासाठी जवळपास ७० टिम कार्यरत करुन सोसायटी निहाय व एरीया निहाय मोबाईल लसीकरण बुथ उभारण्यात आले.
या सर्व उपाय योजना तसेच मिशन कवच कुंडल अंतर्गत पहिल्या डोसचा लक्षांक पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत कोविड लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचारी पुनश्च: सर्वेक्षण केले. ज्या नागरिकांचा पहिला व दुसरा डोस राहिला आहे अशा नागरिकांची नाव नोंदणी करून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
शहरी भागात २५ लसीकरण केंद्र सुरु असून ग्रामीण भागात ३० ठिकाणी आठवड्यातील ठराविक दिवशी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान ज्या नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण राहीले आहे त्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी सातत्याने केले होते.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'हर घर दस्तक' अभियानास सुरूवात करण्यात आली. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने ९ ऑक्टोबर पासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले. ज्यांनी कोविड लसीकरण केलेले नाही अशा नागरिकांना लसीकरणाचे महत्व् पटवून देऊन लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात आले.
ग्रामीण भागातील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे अशा नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच सोसायटी किंवा नागरिकांच्या मागणीनूसार लाभार्थ्याची जास्त असेल तर अशा ठिकाणी लसीकरणाचे खास कॅम्प् लावण्यात आले.
कोविन पोर्टलच्या साह्याने ज्या लाभार्थींचा दुसरा डोस राहिला आहे ,अशा नागरिकांना वॉर रूमव्दारे एसएमएस व फोनकॉलच्या माध्यमातून लसीकरणास प्रवृत्त करण्यात आले. बाजार पेठांमध्येही जनजागृती करण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लसींचे लसीकरण पुर्ण करण्यांकरिता पालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने भोंगा गाडी व त्या सोबत लसीकरण वाहिका (वॅक्सीनेशन व्हॅन) सर्वत्र फिरविण्यात आली.
दुसऱ्या लसीचे लसीकरण पूर्ण करण्याकरिता महापालिका क्षेत्रातील विविध सोसायट्यांमधील ज्या नागरिकांचे लसीकरण राहीले आहे अशा नागरिकांनी भोंगा गाडीजवळ येऊन लसीकरण वाहिकेमध्ये आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते.या सर्व प्रयत्नांमुळे महापालिकेचे कोविडच्या दुसऱ्या डोसचेही १०० टक्के लसीकरण पूर्ण होऊ शकले.
हे अभियान चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी ,वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजारवर, डॉ. मनिषा चांडक यांनी सूक्ष्म नियोजन केले. यासाठी पहिल्या फळीतील कर्मचारी, आशा सेविका यांची मदत घेतली जात आहे. घरोघरी जाऊन लसीकरण झाले आहे की नाही याची नोंद आली.
सध्या १५ ते१८ वयोगटातील लसीकरणावर महापालिका भर देत असून पहिल्या व दुसऱ्या डोसचे शाळांशाळांमध्ये कॅम्प लावण्यात येत आहेत. या लसीकरणासाठी सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहे. तसेच बुस्टर डोसचेही लसीकरण सुरू आहे. आरोग्यकर्मी (हेल्थ वर्कर) , पहिल्या फळीतील कोरोना योध्दे( फ्रन्ट लाईन वर्कर )तसेच व्याधीग्रस्त (कोमाॅर्बिड) असणारे ६० वर्षावरील नागरिक यांना "प्रिकॉशन डोस" दिला जात आहे. ९ ते ५ या वेळेत "प्रिकॉशन डोस "सहा शासकीय लसीकरण केंद्रावर विनामूल्य देण्यात येतआहे.

Post a Comment