News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती- रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील

नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती- रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील

नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती- रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील 
पनवेल - नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती होऊ शकते असे मत रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी नवलेखक, कविता लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या अध्यक्ष सुधीर शेठ होते.
       रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी स्मारक येथे झालेल्या नवलेखक,कविता लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
           महाराष्ट्र राज्य साहित्य आणि  संस्कृती मंडळ मुंबई आणि कोकण मराठी साहित्य परिषद उरण-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या या कार्यशाळेच्या कार्यक्रमास  कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी अ.वि. जंगम,संजय गुंजाळ,गणेश कोळी,अॅड.गोपाळ शेळके,सुखद राणे तसेच शिवव्याख्याते प्रशांत देशमुख उपस्थित होते.
     यापुढे बोलताना प्रा.एल.बी. पाटील यांनी, नवोदित साहित्यिकांनी साहित्य निर्मिती केली पाहिजे. साहित्यातून मराठी भाषेचे संवर्धन होते.कोकण मराठी साहित्य परिषदेने अनेक साहित्यिक घडले आहेत असे सांगितले.
     कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर शेठ यांनी आपल्या भाषणात, नवोदित साहित्यिकांकडून समाज मनाची आंदोलने झाली पाहिजेत. साहित्य निर्मिती करताना ती सक्षम असली पाहिजे. साहित्यिक कार्यक्रमातून कवींच्या कवींवर संस्कारांचे मार्गदर्शन झाले पाहिजे असे सांगितले.
     यावेळी झालेल्या अभिजात मराठी भाषा या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, प्रशासकीय अधिकारी संजय माने यांनी सहभाग घेतला. बोली भाषेतील कविता या झालेल्या चर्चासत्रात डॉ. राजेंद्र राठोड, कवी नामदेव बरतोड,अरुण इंगोले, संध्या देवकर यांनी सहभाग घेतला.
          तसेच कविता कशी स्फुरते? या झालेल्या चर्चासत्रात गझलकार ज्योत्स्ना रजपूत, कवी अजित शेडगे, गंगाधर पालवी सहभाग घेतला. शेवटी कवींच्या रचना या झालेल्या कविसंमेलनात सहभागी कवींनी आपल्या कविता सादर केल्या, त्यांना संयोजकांच्यावतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

1 comments:

  1. सदर कार्यक्रमाच्या आयोजनामागे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अतिशय भारदस्त आणि उदात्त हेतू असून भविष्यामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व्रत घेतलेले कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. आकाशामध्ये चंद्र, सुर्य आणि तिरे असेपर्यंत मराठी भाषा ही टवटवीत राहणार आहे, याबाबत कोणतीही शंका नाही. म्हणून मराठी भाषेचा आग्रह धरताना इतर भाषांचा दुराग्रह करू नये. विशेषतः राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्यासाठी हिंदी भाषेची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना इंग्रजी भाषेची नितांत आवश्यकता आहे. ही वस्तुस्थितीही ध्यानात घेणे गरजेचे आहे. एकंदरीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वांनी कंबर कसली पाहिजे. सदरप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कविता संमेलनामध्ये कविता सादर करणारे शेवटपर्यंत हजर राहतात कारण त्यांची कविता सादर करण्यासाठी उत्सुकता असते. कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध आणि उत्तमरित्या पार पडला. सदरप्रसंगी कर्जत तालुक्याचे कोमसापचे प्रतिनिधी काॕम्रेड जीजी, काॕम्रेड जोहेकर, ज्ञानेश्वर वाडीलेसर आणि श्रीकृष्ण लोहारेसर उपस्थित राहून २३ मार्च शहीद भगतसिंग स्मृतीदिनानिमित्त कर्जत येथे होणाऱ्या ७व्या काव्यसंमेलनाचे जाहीर निमंत्रण देण्यात आले.

    ReplyDelete