कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे नाव शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूला द्या .....
कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे नाव शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूला द्या .....
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी ...
पनवेल - कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूला द्यावे अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
महेंद्र घरत यांनी केलेल्या या मागणीचा विचार व्हावा असे बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.
बॅरिस्टर अंतुले यांनी रायगड जिल्ह्यात अनेक मोठमोठे प्रकल्प आणून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचे नाव दिले.मुख्यमंत्री असताना अनेक धाडसी निर्णय घेऊन रायगडचा कॅलिफोर्निया बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.केंद्रीयमंत्री असताना रायगड जिल्हयाबरोबरच देशातील अनेक जिल्ह्यातील जनतेला त्यांच्या खात्याचा फायदा झालेला आहे.धाडसी नेतृत्व फक्त जिल्हा पुरतेच मर्यादित नव्हते तर राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते,असे जनसामान्यांचे नेतृत्व असलेल्या बॅरिस्टर ए .आर .अंतुले यांचा यथोचित सन्मान व्हावा,यासाठी त्यांचे नाव शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूला देण्यात यावे अशी मागणी महेंद्र घरत यांनी केली आहे.
Post a Comment