News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा पनवेलमध्ये निषेध

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा पनवेलमध्ये निषेध

पनवेल - काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना अपशब्द बोलत त्यांचा अपमान केला.त्यामुळे संतप्त झालेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या शिष्य गणांनी,भक्त गणांनी संपूर्ण महाराष्ट्रात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू आहे आज पनवेलमध्ये पनवेल बस स्टँड येथे स्व स्वरूप संप्रदाय  तालुका पनवेल जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांचा जाहिर निषेध करण्यात आला. 
यावेळी ६०० हून अधिक भाविक भक्त,शिष्यगण यावेळी उपस्थित होते.माफी मांगो,माफी मांगो विजय वडेट्टीवार माफी मांगो,हिंदू धर्माचा विजय असो,साधू संताचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध,जगद्गुरूंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा शब्दात घोषणा देत विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला.यावेळी भाविक भक्त,शिष्यगण आक्रमक झालेले दिसून आले. विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्या विषयी जगदगुरु नरेंद्रचार्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाविक भक्त,शिष्य गणांनी केली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment