News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

स्व.लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप नेते,रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जासई येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन ...नामांकित डॉक्टरांकडून विविध आजारांचे निदान होणार एकाच ठिकाणी

स्व.लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप नेते,रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जासई येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन ...नामांकित डॉक्टरांकडून विविध आजारांचे निदान होणार एकाच ठिकाणी

पनवेल- स्व.लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप नेते,रायगड जिल्हा खजिनदार
प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जासई येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आज महाराष्ट्रात विविध प्रकारे असणाऱ्या रोगांचे निदान होत आहे परंतु योग्य वेळी योग्य सल्ला न मिळाल्यामुळे सदर रोगाचे प्रमाण वाढवून त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात या अनुषंगानेच स्वर्गीय लोकनेते श्री दि.बा.पाटील साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप नेते रायगड जिल्हा खजिनदार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे केले आहे 

या शिबिरामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल,मेडीकव्हर हॉस्पिटल,न्यु ईरा हॉस्पिटल,सुश्रुषा हॉस्पिटल यांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल यांच्या सौजन्याने मोफत औषध रुग्णांना देण्यात येणार आहे.सदर महाआरोग्य शिबिरात पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन  यांच्या 40 पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित राहून रुग्णांना सेवा देणार आहेत.दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी चे संचालक श्री.दीपक कुदळे यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी मोफत थायरॉईड चेकअपची सेवा देण्यात येणार आहे.  

आर जे.शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी करून आवश्यक असल्यास योग्य ती शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.शस्त्रक्रिये दरम्यान प्रवासाची संपूर्ण व्यवस्था सुद्धा रुग्णांना  करून देण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये आवश्यकती रक्ततपासणी, जनरल बॉडी चेकअप आणि तज्ज्ञांचा मोफत सल्ला देण्यात येईल.अशाप्रकारे माहिती आयोजक शेतकरी कामगार पक्ष,पनवेल- उरण व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment