महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी (नगरपरिषद) निवड झाल्याबद्दल पनवेलच्या देवीचापाडा गावातील दिपाली रामचंद्र पाटील हिच्यावर अभिनंदन,शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल - देवीचापाडा गावातील श्री.रामचंद्र नामदेव पाटील यांची कन्या कु.दिपाली रामचंद्र पाटील हिची महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी (नगरपरिषद) निवड झाल्याबद्दल तिच्यावर सर्वचस्तरातून अभिनंदन,शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्रामस्थ मंडळ देवीचापाडा यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला,याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर,विभागप्रमुख प्रमोद पाटील,उपविभागप्रमुख परशुराम भोपी,युवासेना तालुका अधिकारी मनोज कुंभारकर,युवासेना पनवेल विधानसभा चिटणीस जीवन पाटील,शाखाप्रमुख विलास पाटील,शाखाप्रमुख व सरपंच नितलस श्री संदीप पाटील,श्री सुनिल काठे (मा. सरपंच )माजी सरपंच श्री दिलीप पाटील,माजी सरपंच रामदास फडके तसेच देवीचापाडा गावातील संजय पाटील,ज्ञानदेव पाटील,नंदकुमार साखरे, सूर्यकांत पाटील विकास पाटील दिनेश म्हात्रे,विजय पाटील,वडील रामचंद्र पाटील,भाऊ प्रदीप पाटील ह्यांची उपस्तिथी होती.
भारतीय जनता पार्टी महानगरपालिका प्रभाग २ च्या वतीनेही सत्कार करून तिला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर,माजी सरपंच राम पाटील, युवा मोर्चा प्रभाग २ अध्यक्ष शुभम खानावकर,आकाश फडके,करण फडके उपस्थित होते.
Post a Comment