तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, गव्हाण-कोपर शाळेची १००% निकालाची परंपरा कायम!
पनवेल- स्व.जनार्दन भगत यांचे सहकारी स्व.तुकाराम घरत यांच्या नावाने असलेल्या पनवेल तालुक्यातील तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, गव्हाण-कोपर या शाळेची १००% विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची परंपरा याही वर्षी कायम राहिली.इयत्ता १२ वीच्या ७५ पैकी ७५ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.यामध्ये कु.कुंडलिक नैला अकलाक प्रथम क्रमांक, कु. सागवेकर फैसल फरियाद,द्वितीय क्रमांक तर म्हात्रे तनिष बळीराम यांनी तृतीय क्रमांक पटकावले.जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.रामशेठ ठाकूर साहेब तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल कौन्सील सदस्य श्री. महेंद्रशेठ घरत यांनी यशस्वी विदयार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
Post a Comment