पनवेल काँग्रेसच्या अल्टिमेटममुळे नवी मुंबई मेट्रो रुळावर- पनवेल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील
पनवेल: नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ वर शुक्रवार दि.१७ नोव्हेंबरपासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र मेट्रो प्रकल्पाचे काम होऊनही गेली ४-५ महिने उद्घाटनाविना मेट्रो रखडली होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता लवकरात लवकर नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण करून रेल्वे सेवा प्रवाशांसाठी खुली करावी अन्यथा पनवेल जिल्हा काँग्रेस मेट्रोचे अनौपचारिक उद्घाटन करेल,असा इशारा पनवेल काँग्रेसने दिला होता.
पनवेल काँग्रेसने सिडको तसेच सरकारला दिलेल्या अल्टिमेटममुळेच रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचा प्रवास सुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील म्हणाले.गेली ४-५ महिने मेट्रो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. नवी मुंबईकर नागरिक देखील रेल्वे सेवेच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी काँग्रेसने आवाज उठवल्यामुळे वेगाने सूत्रे हलू लागली अन् औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता शुक्रवारपासून मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
Post a Comment